Sunday, August 8, 2021

ऑलिम्पिक मधून आपल्या फायद्याची गोष्ट

लोकमत वृत्तपत्रातील घेतलेले चित्र ०९.०८.२०२१

मिल्खा सिंग यांचे चौथे येणे किंवा काही शतांश सेकंदाने हुकलेले पी.टी. उषाचे पदक यांच्याच आठवणी वारंवार, प्रत्येक ऑलिम्पिक आधी उगाळल्या जातात.  एकेकाळी क्रिकेट किंवा व्हॉलीबॉल खेळाकडे आकर्षित होऊ शकणार्या नीरज चोप्राच्या गुणवत्तेला लष्कराने ऑलिम्पिक सुवर्ण पदकापर्यंत पोहोचण्याइतपत सक्षम केले. भारताच्या ऑलिम्पिक इतिहासात एथलेटिक्स खेळातले हे पहिले पदक तेही सुवर्ण पदक. नीरज बद्दल बोलायचे तेवढे कमीच, प्रशंसा शब्दात मावेना पण आज मला तुमचं लक्ष एका विशिष्ठ पैलू कडे वेधून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण ऑलिम्पिक मधून प्रेरणा घेऊ आणि आपले, आपल्या मुलांचे किंवा आप्तांचे भविष्य उज्ज्वल बनवण्याच्या मार्गी लागू.


नीरज भालाफेक मध्ये सुवर्ण पद मिळवणारा भारताचा पहिला खेळाडू, वय २३ वर्ष. आपण अंदाजे गृहीत धरू कि मागील १० वर्ष पासून नीरज नित्य नियमाने सराव करत असावा. तेव्हा त्याचे वय असेल १३ वर्ष. तेराव्या वर्षी पासून नीरज ला जीवनात काय करायचे आहे त्याची स्पष्टता असावी, नीरज ला किंवा त्यांच्या पालकांना. तेवीस व्या वर्षी नीरज जीवनात एवढा मोठा सन्मान, गौरव पटकावला त्याला पैश्यात मोजणे अशक्यच पण समाज माध्यमातून जी माहिती उपलब्ध आहे त्यावरून जर आपण नीरज ला मिळणाऱ्या बक्षीशे चा आढावा घेतला, तर ती खालील प्रमाणे.


  • हरियाणा मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर ६ कोटीचे बक्षीस व श्रेणी-१ राज्यसरकारची नोकरी जाहीर केली

  • पंजाब सरकार २ कोटीचे बक्षीस

  • मणिपूर मंत्रिमंडळाने ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यास १ कोटीचे बक्षीस देण्याचा निर्णय घेतला

  • भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) चोप्रासाठी १ कोटी रोख बक्षीस जाहीर केले

  • इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्स ने भाला फेकणाऱ्याला १ कोटीचे बक्षीस जाहीर केले

  • भारतीय विमान कंपनी इंडिगोने घोषणा केली की ती नीरज चोप्राला एक वर्षासाठी अमर्यादित मोफत प्रवासाची ऑफर देईल.

  • उद्योजक आनंद महिंद्राने सुवर्णपदक विजेत्याला आगामी SUV XUV700 भेट देण्याचे आश्वासन दिले आहे.

  • भारतीय रेल्वे - ३ कोटी

  • भारतीय ऑलिम्पिक महासंघ - ७५ लाख

  • बीजू (BYJU) कंपनी - २ कोटी


एकूण १६.७५ कोटी रुपये बक्षीस आणि इतर वस्तू स्वरूपातील बक्षीशे वेगळी. यातून आपला काय फायदा हो? अहो आपला काही फायदा नाही मान्य आहे पण यातून खूप काही शिकण्या सारखे आहे, थोडं थंड डोक्याने विचार करा एकदा, कदाचित आपल्याला उमजेल कि यातून काय शिकायला पाहिजे. ३ तास आणि १६.७५ कोटी रुपये, किती विलक्षण वाटत ना! पण ते ३ तास म्हणजे नीरज ची १० वर्षाची परिश्रम आहेत. वयाच्या २३ वर्षी सर्वसामान्य माणूस पदवी मिळवून नौकरी च्या शोधात असतो शहरांमध्ये फिरत असतो. खूप शोधाशोध केल्यानंतर त्याला १० हजार ते ३० हजार पगार असणारी नौकरी मिळते आणि तो तेव्हा खूप खुश असतो. पालकांना त्याचे खूप कैतुक वाटते. आणि मग २३ व्य वर्षी आपले पहिली कमाई सुरु होते १० हजार ते ३० हजार पासून.


१६.७५ कोटी सर्वसामान्यांना स्वप्नातही कधी दिसत नाहीत आणि कोणी एवढे पैसे कमावण्याचे असामान्य स्वप्न सुद्धा चुकीनाही बघत नाही. पण स्वप्न का बघू नये? स्वतःच्या मुला मुलींनी कोणत्या खेळात भारतासाठी स्वर्ण पदक मिळवायचं हे तुम्ही (पालक) का ठरवू शकत नाही. लहानपणा पासून सराव चालू ठेवला तर नक्कीच स्वर्ण पदक मिळवणे कठीण नाही. चीन का सर्व खेळांमध्ये अग्रेसर आहे? कारण तिथे लहानपणा पासून ठरवलं जात कोणत्या खेळात सुवर्ण पदक मिळवायचं आहे आणि त्याप्रमाणे सराव केला जातो.


पण आपण लागतो नौकरी च्या मागे. नौकरी करून १६.७५ कोटी पूर्ण आयुष्य काळात आपण मिळवू शकत नाही. त्यात आपले चूक नाही हो, आपल्याला लहानपणापासूनच तस बिंबवल्या जात, बेटा अभ्यास कर तरच छान नौकरी मिळेल.


१९९२ पासून भारताने फक्त २८ मेडल्स (२०२१ ऑलिम्पिक मेडल्स सोडून) मिळवले आहेत. अमेरिकेचा मचाले फेल्प्स (michael-phelps) याने एकट्याने २८ मेडल्स जिंकलेले आहेत. जगात दुसऱ्या नंबर वर आपण लोकसंख्येच्या बाबतीत आहोत तरी आपण फक्त २८ मेडल्स आजपर्यंत मिळवू शकलो आहोत. टोकियो २०२१ पूर्वीच्या ऑलिम्पिकमधील ४२ स्पर्धांपैकी भारताने फक्त आठ खेळांमध्ये पदके जिंकली आहेत. ऑलिम्पिक मध्ये पदे जिंकून देशाचं आणि स्वतःच नाव मोठं करण्याची आपल्यात किती मोठी संधी आहे यावरून लक्षात येऊ शकते. गरज आहे ती फक्त ज्वलंत इचछाशक्तीची, दृढ निश्ययची, चिकाटीची, मार्गदर्शनाची


5 comments: