Friday, October 11, 2019

राष्ट्रवाद, हिंदुत्ववाद, पाकिस्तान, निंबू मिरची आणि चुपचाप पोटावर लाथ

राष्ट्रवाद, हिंदुत्ववाद, पाकिस्तान, निंबू मिरची च्या नावावर कामगारांच्या पोट पाण्यावर कशी लाथ मारली जात आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. आपण निवडून दिलेली नवीन सरकार आपल्यावरच कसा तंज कसत आहे हे आपल्याला सरकार च्या सार्वजनिक क्षेत्राचे निजीकरण करण्याच्या धोरणावरून कळायला हवे. गेल्या काही महिन्यात देशात ठीक ठिकाणी सरकारने ज्या कंपनी चे निजीकरण करण्याचे ठरवले आहे त्या कंपनीचे कामगार वर्ग सरकार विरोधात मार्च (protest) करत आहेत. News चॅनेल मधून आपल्याला कामगारांच्या संपाची माहिती मिळेल याची अपेक्षा ठेवणे जरा जास्तच होईल.


सरकारी जॉब ला आपल्या समाजात किती महत्व आहे हे विशेष सांगायची गरज नाही. पण गमतीचा भाग बाजूला ठेऊन ते महत्व का आहे हे आपण गांभीर्याने समजून घेतले पाहिजे. सरकारी नोकरी चे महत्व एखाद्या Private कंपनी मध्ये काम कारणाच्या कामगारांशी संवाद साधल्यावर आपल्याला कळेल. सरकारी कंपनी मध्ये काम करणार्यांना काम करायची गरज नसते हा एक चुकीचा समज आपल्या समाजात आहे, त्यामुळे आपल्या डोक्यात एक चुकीची किंवा दुय्यम सरणींचा विचार सरकारी कंपनी बद्दल आहे.

खाली नमूद केलेल्या सगळ्या सार्वजनिक कंपन्या चे निजीकरण करण्याचा निर्यय सरकार घेत आहे किंवा काही घेतले सुद्धा आहेत.

> Bharat Petroleum Corp Ltd (BPCL)
- १९५२ साली सुरु झालेली
- १५ हजार स्वतःच्या मालकीचे पेट्रोल पंप आहेत
- ३३ मिलियन तेल शुद्धीकरण करण्याची क्षमता आहे, जे कि पूर्ण देशात लय क्षमतेच्या १३% आहे.
मग एवढा सगळं चांगलं असून सरकार का या कंपनीचे निजीकरण करत आहे? नक्कीच हि कंपनी घाट्यात असणार मग.
- ३५,१८२ करोड रुपये मागच्या वर्षात नफा आहे.
- १९६०३ करोड रुपये या कंपनीने मागच्या वर्षात कर भरला आहे सरकार ला.
- ९००० करोड रुपये डिवीडेंट सरकार ला दिलेलं आहे
- २०१७ मध्ये सरकारनेच या कंपनीला महारत्न अवॉर्ड दिलेला

> Shipping Corp of India (SCI)
- १९५० साली सुरु झालेली
-शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही देशाच्या औद्योगिक अर्थव्यवस्थेच्या केंद्रस्थानी आहे आणि सुमारे 70 मालवाहू जहाजांच्या जवळजवळ $1.2 billion डॉलर्सची किंमत आहे.
- भारतातील सर्वात मोठे महासागर वाहक या कंपनी कडे आहे
बाकी खाली नमूद केलेल्या कंपनी पण अश्याच प्रकारे आपापल्या क्षेत्रात उत्तम आहेत. मी सर्वांचे तपशील येथे देऊ शकत नाही पण तुम्ही थोडा शोध घेऊ शकता.

> Tehri Hydro Development Corporation Limited (THDC India)
- १९८८ साली सुरु झालेली

> North Eastern Electric Power Corporation Limited (NEEPCO)
- १९76 साली सुरु झालेली

> Container Corp of India (Concor)
- १९८८ साली सुरु झालेली

> Attempt to Privatise Air India Last Year
- १९30 साली सुरु झालेली

> BSNL (2000 
साली सुरु झालेली) and MTNL (1986 साली सुरु झालेली) finance ministry is planning to shutdown these public sector युनिट्स

आपल्या कोण्यातरी मित्र मित्रणींचे आई वडील नक्कीच BSNL or MTNL काम करत असणार.
१० वर्षा आधी या कंपन्यांचे खूप प्रभुत्व या क्षेत्रात होते, काय कारण आहे की आपल्या सरकार ला सांभाळता आले नाही?

> Airports of Lucknow, Ahmedabad, Jaipur, Mangaluru, Thiruvananthapuram, and Guwahati given to Adani Group to operate for 50 years.

> Indian Railway (IR) is getting ready with a set of bidding documents to invite private train operators — including global players — to run trains and fix their own fares in 150 routes.

> Coal India Ltd (CIL) (1975
साली सुरु झालेली) and its subsidiaries with a minor fraction mined by another PSU, Singareni Collieries Company लटड

> The Chennai Metro Rail Corporation (CMRL) (2015
साली सुरु झालेली) is all set to be privatised
> Salem Steel Plant
- १९73 साली सुरु झालेली


निजीकरण करून सामान्यांचीच गर्दन कटणार आहे हे निच्चीत, आता नाहीतर भविष्यात. निजीकरण मुले नक्की कोणत्या वर्गाला फायदा होत आहे?. जे लोक Private कंपनी मध्ये काम करत आहेत ते नक्कीच विचार करतील मी कशाला टेन्शन घेऊ या सगळ्यांचा. पण तुमच्या येणाऱ्या पिढीला या सगळ्या प्रश्नांना सामोरे जावे लागणार याचा आपण थोडा विचार करायला पाहिजे आणि कुणाचा ठाऊक आपल्याला पण कदाचित.

सरकारी कंपनी चांगली की Private हे तुम्हाला चांगला माहित आहेच
आपण कधी विचार कराल?

(
बुद्धिजीवी वर्ग, ग्रामर मिस्टेक काढू नये, मूळ विषय समजून घ्यावा)

3 comments:

  1. Really more awareness is needed..Good article

    ReplyDelete
  2. Very true.The government's deficit and the losses of public sector banks (NPAs) is so large that privatising public sector companies is like selling family jewellery to pay the debt and for the government to survive. They have to make up the government's debt. So the easy way is to sell profitable companies.

    ReplyDelete