Friday, May 19, 2023

आपल्या समाजात लग्नानंतर घरात येणाऱ्या सर्वात सामान्य समस्या

 आपल्या समाजात लग्नानंतर घरात येणाऱ्या सर्वात सामान्य समस्या


डिस्क्लेमर


या ठिकाणी आपण फक्त लोअर मिडल क्लास कुटुंबाबद्दल बोलणार आहोत. सर्वांच्या घरात ह्या समस्या असतीलच असे नाही. कुणाचीच भावना दुखावण्याची मानशा इथे नाही, जर कुणाची भावना नकळत दुखावली गेली तर त्यांची मी क्षमा मागतो. या लेखात लिहलेली प्रत्येक बाब प्रत्येकाला लागू असेलच असे नाही. कुणीही वाईट मानून घेऊ नये.


संदर्भ


एक काल्पनिक कुटुंब आपण इथे गृहीत धरू, जेणेकरून परिस्थिती गोष्टी स्पष्टपणे मांडण्यात मदत होईल.सेवानिवृत्त झालेले बाबा, गृहिणी आई, २ भाऊ लग्न झालेले. असे कुटुंब एकत्रित राहत आहे. मोठ्या भावाची पत्नी शिक्षिका आहे. लहान्या भावाची पत्नी गृहिणी आहे. या कुटुंबाचा संदर्भ आपण पुढच्या लेखामध्ये घेऊन विविध समस्यांवर संभाषण करू.



मुद्दा क्रमांक १


सून आणि सासू-सासरे यांचे एकमेकांशी न पटणे. न पटायला आता खूप सारी कारणे आहेत. मोचकी कारणे मी खाली लिहत आहे.


१. सासू-सासरे यांना त्यांच्या ठरलेल्या वेळेवर एखाद्यावेळेस जेवण न देणे

२. सासू-सासरे यांना जेवण दिल्यावर पाण्याचा तांब्या न ठेवणे

३. सासू-सासरे यांच्या जेवण आधी सुनेने जेवण करून घेणे

४. नवर्याच्या आधी सुनेने जेवण करून घेणे

५. भांडी साफ न घासणे

६. घर वेळेवर झाडून न काढणे

७. पलंगावरची चादर न बदलणे

८. स्वयंपाकघर साफ न ठेवणे

९. कपडे स्वच्च न धुणे

१०. सुनेने किती पोळ्या खाल्ल्या याचा हिशोब ठेवणे

११. सुनेने स्वतःसाठी जर चहा किंवा इतर काही खाद्य पदार्थ केला असेल

१२. सुनेने आवडी निवडी च्या भावातून स्वतःसाठी वेगळी भाजी बनवली असेल आणि सासू-सासरे साठी वेगळी

१३. सुनेने स्वतःसाठी भाकर आणि सासू-सासरे साठी पोळ्या बनवल्या असतील

१४. सुनेने घरात असलेल्या वाशीम मशीन चा वापर केला असेल

१५. सून सासू-सासरे यांना न विचारात शेजारच्या बाई सोबत फिरायला गेली असेल

१६. सून जर दुपारी झोप घेत असेल

१७. सून सकाळी सासू-सासरे च्या उठायच्या वेळेवर उठत नसेल

१८. सून तिच्या माहेरच्यांशी जास्त फोन वर बोलत असेल

१९. सुनेला माहेरी जायचा असेल तर सासू-सासरे ना सुनेच्या घरच्यांचा फोन आला नसेल

२०. सुनेला माहेरी घेऊन जायला तिचा घराचा सदस्य सोडून दुसरा नातलग आला असेल

२१. स्वयंपाकघरातले बेसिन कचरा गेल्याने ब्लॉक झालं असेल

२२. संडास-बाथरूम साफ केले नसेल

२३. जेवण चांगले झाले नसेल

२४. सासू-सासरे सुनेच्या अवगुणांचा दोष तिच्या आई ला अपशब्दात मोठ्या आवाजात बोलणे

२५. जर सून गरीब घरातली असेल तर तिला खालचा दर्जा देणे, नेहमी तिला तिची लायकी दाखवणे

२६. बाळ होत नसेल तर तिला ऐकू जाईल अश्या आवाजात पण तिच्या मागे अपशब्दात कुजबुक करणे

२७. सून गर्भवती असल्यावर ती जर बाळाच्या चांगल्या वाढी साठी चांगले पोषणयुक्त आहार घेत असेल तर त्याचा सासू-सासरे यांना प्रॉब्लेम असणे

२८. सून गर्भवती असल्यावर सुनेने आरामात काम केली तर त्याचा सासू-सासरे यांना प्रॉब्लेम असणे

२९. सून गर्भवती असल्यावर नवऱ्याने थोडी मदद केली तर सासू-सासरे यांना प्रॉब्लेम असणे

३०. सून गर्भवती असल्यावर नवऱ्याने डॉक्टर कडे घेऊन गेल्यास सासू-सासरे यांना प्रॉब्लेम असणे

३१. नवऱ्याने बायकोला एखाद्यावेळेस बाहेर काही खायला नेले तर सासू-सासरे पोरावर "बायकोचा गुलाम झाला" असे आरोप कारणे

३२. सुनेचा एकही चांगल्या गुणांची तारीफ न करणे, नेहमी कमतरता काढणे

३३. सासू-सासरे एकमेकांसोबत भांडणे करणे

३४. सासरे बॉ घरात सिगारेट किंवा मद्य प्रश्न करणे

३५. सासरे बॉ घरात घाणेरडी शिवीगाळ करणे


आता हि यादी संपत संपेना पण मी इथेच थांबतो. प्रत्येक कारणाच्या सखोल मध्ये जायचा म्हटलं तर एक पुस्तकाचं लिहून होईल.या सगळ्यांमध्ये खराब होतात ते संबंध, जन्मभर ते तसेच तुटलेले राहतात. या सगळ्यात दोष कुणाचा आहे यात गेलो तर त्यावर एक स्वतंत्र पुस्तक लिहता येईल.



मुद्दा क्रमांक 2


आई वडील मुलाने लग्न करावं यासाठी लग्नासाठी खूप मास्क लावतात पण एकदा का लग्न पार पडलं कि मात्र आपले हात वर करतात. तो मुलगा त्याच्या आयुष्यात सगळ्या परिस्तितींना पहिल्यांदाच सामोरे जात असतो, अश्यात कसे वागावे, काय प्रतिक्रिया द्याव्यात हे त्याला समजने अवघड होते. सासू-सासरे यांचे कर्तव्य ठरते कि जी नवीन मुलगी त्यांच्या घरात आलेली आहे, तिला स्वतःच्या मुली सारखी वागणूक मिळाली पाहिजे. सून सुद्धा तीच अपेक्षा सासू-सासरे कडून करत असावी. कारण घर सोडल्यावर सासू-सासरेच आई वडिलांची जागा घेत असतात. पण याची जाणीव सासू-सासरे यांना हवी. सून तिच्या घराच्या पद्धती, वापराने, सवई सोबत घेऊन आलेली असते, नवीन घरात त्या सर्व पद्धती सर्व-सामान्यपणे वेगळ्याच असतात, तिला त्या पद्धती ची ओळख करून देणे सासू-सासरे चा काम आहे. तिच्यात काही अवगुण असतील तर शिस्त लावणे सासू-सासरे चा काम आहे. हा जो बदल आहे, हा बदल घडविण्यातच जर सासू-सासरे असक्षम ठरले तर मात्र घरात भांडणे सुरु होतात.

सासू-सासरे सुनेला शिकवण्याची पद्धत कशी वापरतात यावर सगळं खेळ अवलंबून असतो असे मला वाटते. सासू-सासरे जी शिष्ट सुनेला लावायला सांगत आहेत, ती सासू-सासरे त्यांच्या वागण्यातून कृतीतून सुद्धा प्रकट करतात कि फक्त सुनेला ज्ञान देण्यासाठी जीभ मोकळी करतात यावर सुद्धा बरेच काही अवलंबून असते.


स्वतःची मुलगी समजून जर सुनेचा सांभाळ सासू-सासरे नि सुरवातीपासून केला तर मला तरी वाटत नाही कि घरात कसल्याही प्रकारची भांडणे व्हायला काही व्याप्ती राहत नाही.



मुद्दा क्रमांक ३


ढोबळमानाने घरात मोठी वहिनी कसलीही कामे करत नाही, करते पण जेमतेम, असे आपल्या निदर्शनास आले असणार. नवीन जनरेशन कदाचित अपवाद असू शकेल पण आपले आई वडील, काका काकू यांच्या कुटुंबाचा निरीक्षण केले तर तसे जास्त प्रमाणात आढळून येईल. लहान सून घरात येई पर्यंत मोठ्या सुनेने सर्व कामे केलेली असतात, याचा अभिमान मोठ्या सुनेला नक्की असतो आणि घरात लहान सून आली कि मोठी सून करत असलेली सर्व कामे लहान सुनेनी करायची अशी ढोबळ अपेक्षा मोठ्या सुनेला असते आणि हे असेच चालत परंपरागत चालत आलेलं असावाही कदाचित. नवीन पिढी मात्र तोंडास उत्तर देते, कोणताही मुलाहिजा ना ठेवता प्रश्नाला लगेच उत्तर देते. लहान सून काही दिवस सगळी कामे करते नंतर मात्र उठाव सुरु होतो. मीच सगळी कामे का करायची? इथून सुरु होतो सुनांमधला वाद विवाद. तो वाद मग फक्त त्यांच्यापुरताच राहत नाही तर नवऱ्यांना पण त्याची झळ लागायला सुरु होते, बायको किरकिर करायला लागते. नवरा मात्र मौन धारण करतो या सगळ्यात कारण तो कुणाची बाजू घेऊ शकत नाही, त्याला सर्व जण प्रिय असतात, कुणाला दुखावण्याची त्यांनी एकच मात्र नसते (सगळे नवरे असेच असतील असे मात्र मुळीच नाही). मग सून काही दिवस किरकिर करते आणि मग उठावाचा (शीतयुद्ध) रूपांतर खऱ्या खुऱ्या मोठ्याने बोलून शब्दात (भांडणात) होत. पूर्ण आयुष्य बाकी असत आणि सर्व काही सुरु होण्याच्या आधीच सुना भांडायला सुरु करतात आणि त्या भांडणातला अबोला हा काहीवेळेस पूर्ण आयुष्यभर राहतो. क्षुल्लम कारणांवरून ह्या सुना आयुष्यभराचा अबोला धरतात.

मोठी सून आपल्या नवऱ्याला सांगते कि सासूबाई आणि इतर काका चे कुटुंब जेव्हा एकत्रीत येते तेव्हा सासूबाई किती कामे करतात? तेव्हा मात्र नवऱ्याला शांत बसावं लागत. मग तसेच आपल्या घरात का नाही, मी मोठी आहे तर लहानीला कामे करायला काय समस्या आहे.

लहान सून आपल्या नवऱ्याला सांगते कि मीच सगळी कामे का करावी, कामे विभाजित का होऊ शकत नाही?


मला असे वाटते, परंपरागत चालत आलेल्या सगळ्या गोष्टी चांगल्याच असतील असे मानने मुळीच बरोबर नाही. आपण आपला विवेक, तर्कशास्त्र वापरून नक्कीच काय करणे योग्य असेल काय अयोग्य असेल याचा निकाल लावू शकतो. मला असे वाटते, सामंजस्याने घेऊन कामे विभागून घेतली तर कुना एकावर ताण येणार नाही.





असे अनेक मुद्दे आहेत, जसे मला सुचतील तसे मी हा लेख अद्यावत करत राहील. तूर्तास तुमची मी राजा घेतो.


No comments:

Post a Comment