Sunday, July 2, 2023

माझ्या एका मित्राचं आयुष्य

 ३ BHK फ्लॅट अठराव्या मजलीवर, त्याच भाडं ४६ हजार रुपये, फ्लॅट मध्ये कपडे धुवायला वॉशिंग मशींग. प्रत्येक रूम मध्ये AC. मॉड्युलर किचन, फ्रीझ, घर झाडून काढायचा काम रोबोट करतो. रोबोट ला मोबाईल अँप मधून ऑर्डर सोडावी लागते मग तुम्ही घरी असो वा नसो रोबोट घर झाडून काढतो. घरातील light, fan सर्व काही स्मार्ट, आपण कसे घरात लहान मुलं असलं कि त्याला ऑर्डर देतो light सुरु कर, फॅन थोडा वाढव तशीच ऑर्डर तुम्ही आता अलेक्सा ला दिली म्हणजे lights/fan चालू बंद तुम्ही करू शकता. स्वयंपाक बनवायला, घर आवरायला बाई ठेवली आहे. घरात ६५ इंच चा मोठा सोनी चा टीव्ही त्याच बरोबर होम थिएटर. बाथरूम मध्ये गरम पाण्यासाठी इलेक्ट्रिक गिझर. बाहेर फिरायला जाण्यासाठी चार चाकी गाडी.


बापरे घरात एवढ्या सुविधा! ऐकून थक्क झालात ना? पण अजून तर खूप सांगायचं राहील.


सोसायटी मध्ये काय काय आहे ते पण बघू.

१. बँक

२. ATM 

३. रेलिअन्स रिटेल सारखं शॉप

४. नाश्ता/चहा साठी हॉटेल

५. बॅटमिंटन कोर्टस

६. टेनिस कोर्ट्स

७. टेबल टेनिस कोर्ट्स

८. इंडोर खेळांसाठी वेगळा हॉल

९. खूप सारे पाहुणे आले घरी तर त्यांच्या साठी सोय

१०. लायब्ररी

११. स्टडी रूम

१२. योगा हॉल

१३. स्विमिन्ग पूल

१४. ओपन जिम

१५. closed जिम

१६. गार्डन


एवढ्या सगळ्या सुविधा मिळाल्यावर जीवनात अजून काय पाहिजे?

तुम्हाला काय वाटत अजून काही राहत का बाकी जीवनात?

Friday, May 19, 2023

आपल्या समाजात लग्नानंतर घरात येणाऱ्या सर्वात सामान्य समस्या

 आपल्या समाजात लग्नानंतर घरात येणाऱ्या सर्वात सामान्य समस्या


डिस्क्लेमर


या ठिकाणी आपण फक्त लोअर मिडल क्लास कुटुंबाबद्दल बोलणार आहोत. सर्वांच्या घरात ह्या समस्या असतीलच असे नाही. कुणाचीच भावना दुखावण्याची मानशा इथे नाही, जर कुणाची भावना नकळत दुखावली गेली तर त्यांची मी क्षमा मागतो. या लेखात लिहलेली प्रत्येक बाब प्रत्येकाला लागू असेलच असे नाही. कुणीही वाईट मानून घेऊ नये.


संदर्भ


एक काल्पनिक कुटुंब आपण इथे गृहीत धरू, जेणेकरून परिस्थिती गोष्टी स्पष्टपणे मांडण्यात मदत होईल.सेवानिवृत्त झालेले बाबा, गृहिणी आई, २ भाऊ लग्न झालेले. असे कुटुंब एकत्रित राहत आहे. मोठ्या भावाची पत्नी शिक्षिका आहे. लहान्या भावाची पत्नी गृहिणी आहे. या कुटुंबाचा संदर्भ आपण पुढच्या लेखामध्ये घेऊन विविध समस्यांवर संभाषण करू.

Sunday, March 26, 2023

लहान बाळ अंगावर असणे चांगले की वाईट?

 नमस्कार मित्रांनो, मला २१ महिन्याचं बाळ आहे. बाळ माज्या अंगावर आहे, आता अंगावर असणे म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न बहुतेक जणांना पडला असेल, विशेषतः ज्यांना बाळ नाही. 

तर थोडक्यात सांगायचं झालं तर, बाळ माज्या अंगावर जास्त खेळणे, मी दिसलो कि लगेच माज्याकडे धावत येणे, मिठी मारणे आणि त्याला मी घेण्यासाठी तो देहबोली करून सांगण्याचा प्रयत्न करणे कि बाबा मला घ्या, उचला मला. बाळ खेळण्यासाठी अंगावर चढणे, खांद्यावर बसने, पोटावर बसने, अंगावर चढून उडी मारणे अश्या प्रकारे बाळ अंगावर खेळणे, अश्या प्रकाराला म्हणतात बाळ जास्त अंगावर असणे.


बाळ अंगावर असणे हे चांगले कि वाईट याला विविध विचार प्रवाह असू शकतात.