Saturday, July 9, 2016

Sirsala Maruti Temple Story

गाव : सिरसाळा
जिल्हा : जळगाव
दिनांक : ११/१८/२०१५
खूप दिवसांनी बंगलोर वरून  सुट्टी काढून घरी गेलेलो. फमिली सोबत वेळ काढायचा  म्हणून कुठेतरी बाहेर फिरायला निघालो मध्ये मंदिर बघून आई नि गाडी थांबवायला  सांगितली तिथे आलेला अनुभव तुमच्यासोबत share करतो.



१० कि .मि  बोदवड पासून. जागृत हनुमंताचे मंदिर या परिसरात विशेष म्हणून ओळखले जाते . मंदिर परिसरात असणाऱ्या लोकांना विचारपूस केल्यावर मिळालेली माहीत मी तुमच्या समोर मांडतो . मुंबई पुणे आणि दूर दुरून येथे भाविक दर्शनासाठी येतात . हे मंदिर विशेष करून भाविकांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ओळखले जाते . मंदिराच्या पुजारीस विचारपूस केल्यावर अशी माहित मिळाली कि हनुमंताच्या मूर्ती च्या वर जर कुणी घुमट  बांधण्याचा प्रयत्न केला तर दोन दिवसाच्या आत घुमट आपोआप पडून जातो. काही लोकांनी घुमट बांधण्याचा प्रयत्न केला पण तो पडला .  आणखी एक बाब अशी समोर आली कि मूर्ती वर दोन छोटे गड्डे आहेत एक उजव्या हाताला व एक डाव्या हाताला.  भाविकांच्या इच्चा पूर्ण होतील की नाही हे जर जाणून घ्याईचा असेल तर भक्ताला मूर्तीच्या समोर उभे राहावे लागते आणि पुजारी दोन दगड घेतो एक दगड मूर्तीच्या उजव्या हाताला असणाऱ्या गाड्यात ठेवतो व दुसरा दगड डाव्या हाताला असणाऱ्या गाद्द्यात ठेवतो.  जर उजव्या हाताचा दगड पडला तर भक्ताची इच्चा पूर्ण होईल आणि डाव्या हाताचा दगड पडला तर इच्छा पूर्ण नाही होणार असे भक्त समजतात. यालाच भाग मांडणे असेही म्हणतात.  मी हनुमंताची मूर्तीची छायाचित्र तुमच्या सोबत share करतो . फोटो कडे बघूनच माझ्या तुमच्यासारखा व्यक्ती कुणीपण सांगू शकेल कि कोणता बाजूचा दगड आधी पडेल.
आता शिकले सावरलेले लोक जर अश्याप्रकारचा मंदिरात आपले स्वप्न  पूर्ण होतील कि नाही हे जाणून घेण्यासाठी जात असतील तर सांगा त्यांना कोणत्या गोष्टीवरून शिकलेले म्हणावे. पदवीचा एका कागदावरून ? तुम्हीच विचार करा. वैचारिक पातळी जर अशीच मागासलेली राहिली तर शिक्षणाचा काय अर्थ ?
(मराठी grammatical चुका मोजण्याची चूक करू नका)
IMG_20151118_133219.jpg


IMG_20151118_133231.jpg


कोणत्याही वर्गातील जाती धर्माच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही.
-

अमित वाढे

2 comments:

  1. माणूस हा देवावर श्रद्धा ठेवतो....! तसेच तुमच्या आईची सुद्धा श्रद्धा असेल किंवा काही अनुभव असेल म्हणून त्यांनी गाडी थांबवायला सांगितली..! १ वेळेस तुम्ही तुमच्या आई ला विचारणे हे जे काही तुम्ही लिहले आहे सिरसाळा मारोती बद्दल ते योग्य आहे का.... ? बरे झाले गाडी थांबवणारी तुमचीच आई होती दुसऱ्याची आई नव्हती नाहीतर तुम्ही त्यांना तुमच्या लिह्ण्याच्या शैली वरून वाटत तुम्ही त्यांना वेड्यात पण काढले असते......!

    ReplyDelete
  2. तुमचा विश्वास नसेल पण जे मानतात त्याच्या भावना दुखावणे कितपत योग्य आहे त्याचा विचार करने योग्य ठरेल

    ReplyDelete